खेड :तालुक्यातील घाणेखुंटनजीक असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या पाठीमागे असलेल्या कॉलनीजवळील शोषखड्डयात बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 53 वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोशन रामखेलावन लाल (रिव्हरसाईड कॉलनी-घाणेखुंट, मूळगाव उत्तरप्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे.
रोशन लाल हा कंत्राटी पद्धतीवर ठेकेदार निरज सिंग याच्याकडे काम करत होता. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत शिफ्टप्रमाणे नोकरी करण्यास जात होता. रोशन हा कामगार कॉलनीमध्ये आढळून न आल्याने त्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या कारासिंग, समीर यादव हे त्याचा शोध घेत असताना कॉलनीच्या पाठीमागे असलेल्या शोषखड्डयात बेशुद्धावस्थेत आढळला.
शोषखड्डयातून बाहेर काढून बेशुद्धावस्थेतील राकेशला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासले असता त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.