लांजा : वार्ताहर:-छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड लांजा, जमातुल मुस्लिम लांजा, साने गुरुजी विचारमंच व सर्व बहुजन संघटना याच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
लांजा शहरातील काळे छात्रालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान, यावेळी कुमारी स्वरा मुळे हिने शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि शौर्यगाथेवर उत्स्फूर्तपणे विचार मांडले तसेच अल्लाउद्दीन नेवरेकर यांनी शिवाजी महाराज यांच्या जन्मावर पाळणा सादर केला असता शिवप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे यावेळी उपस्थित मान्यवरांतून शिवाजी महाराज यांच्या पराक्रम आणि शौर्य गाथेवर भाषणे झाली.
या कार्यक्रमाला जमातुल मुस्लिम लांजाचे अध्यक्ष शौकत नाईक, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, साने गुरुजी विचारमंचचे सचिव सुधाकर कांबळे, समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष शिवसेना उबाठाचे रविंद्र डोळस, तालुका प्रमुख शिवसेना सुरेश करंबेळे, नितीन शेट्ये, वीरशैव लिंगायत समाज लांजा अध्यक्ष मोहन तोडकरी, साने गुरुजी विचारमंचचे तालुका अध्यक्ष नाना मानकर, मा.नगरसेविका पुर्वा मुळे, जमातुल मुस्लिम समाज लांजाचे जेष्ठ पदाधिकारी अशरफ रखांगी, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष यासिन नेवरेकर, तालुका अध्यक्ष अल्लाउद्दीन नेवरेकर, युवा संघटक जावेद नाईक, इब्राहिम नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे लांजा तालुका अध्यक्ष सिराज नेवरेकर, नसिर मुजावर आदीं मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.