संदीप घाग / सावर्डे:-आगवे येथील लोटाची बाव या ठिकाणी विहिरीत पडलेल्या गवा रेड्याला बुधवारी वनविभागाने सुखरुप बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
गवा विहिरीत पडल्याची माहिती पोलीस पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून वनविभागाला कळवल्यानंतर सावर्डेचे वनपाल उमेश आखाडे व नांदगावचे वनरक्षक अनंत मंत्रे यानी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गव्याच्या सुटकेसाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूने मार्ग करून त्याला विहिरीबाहेर सुखरूप काढले व नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.