पाली : डी.जे.सामंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या *मुख्याध्यापिका नूतन कांबळे* यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशन पाली, रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध यावर एक नाटिका सादर केली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री कांबळे सर, पोलीस हवालदार श्री साळवी सर, महिला पोलीस हवालदार सावंतदेसाई मॅडम,पाली गावचे सरपंच मा. श्री. विठ्ठल सावंत तसेच उपसरपंच मा. श्री.संतोष धाडवे आणि नाणीज बंदोबस्ताकरिता आलेले सर्व होमगार्ड उपस्थित होते.काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आपले विचार व्यक्त केले.तर सह. शिक्षिका बाणे मॅडम यांनी महाराजांच्या कार्याची महती विषद केली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. नूतन कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले. अशाप्रकारे शिवजयंती उत्साहात साजरी केली.