विलवडे रेल्वे प्रवासी संघटना, पदाधिकाऱ्यांची मागणी
संतोष कदम / लांजा
तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकावर जनशताब्दी, मांडवी आणि नेत्रावती एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा व इतर सर्व सुविधाही देण्यात याव्यात यासाठी प्रवासी संघटना पदाधिकाऱ्यानी आमदार किरण सामंत यांना निवेदन दिले.
यावेळी श्री संजय कदम, श्री सुभाष लाड, श्री अमोल रेडीज, श्री दिपक जानसकर, श्री सदानंद खामकर व इतर उपस्थित होते.
याबाबत आमदार सामंत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. परंतु भेट घेवून एक महिना जास्त कालावधी झाल्याने पुन्हा एकदा आमदार किरण सामंत यांची 18 फेब्रुवारी रोजी नरिमन पॉइंट येथे पदाधिकारी श्री सदानंद खामकर ( आरगाव ), श्री विश्वनाथ आयरे ( रिंगणे ), श्री दिपक जानसकर ( शिरवली ), श्री राज हांदे ( रिंगणे ), श्री संतोष कदम ( व्हेळ ), विजय कूळये ( शिरवली ) यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा होऊन आपल्या मागण्या संदर्भात दिल्ली येथे रेल्वे मंत्री यांची भेट घेवून प्रश्न मांडले असल्याचे सांगितले. त्याबाबत केलेला पत्रव्यवहारही दाखवला. रेल्वेचे काम असल्याने वेळ लागेल परंतु एक/दोन एक्स्प्रेसला थांबा मिळेल असे आश्र्वासित केले आहे.
लांजातील विलवडे रेल्वे स्टेशनवर जनशताब्दी, मांडवी, नेत्रावती एक्सप्रेसना थांबा देण्याबाबत आमदार किरण सामंताना निवेदन
