लांजा : केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्गमंत्री ना.नितीन गडकरी हे नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचे विमानतळावर स्वागत करण्याकरिता पालकमंत्री नितेश राणे यांच्या सोबत अपूर्वा सामंत या देखील उपस्थित होत्या.
देवगडचे माजी आमदार स्वर्गवासीय जनार्दन मोरेश्वर तथा आप्पासाहेब गोगटे यांच्या जनशताब्दी वर्षाच्या समारोप समारंभ कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी हे १७ फेब्रवारी रोजी सिंधुदुर्गात आले होते.
यावेळी त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची कन्या तथा युवा नेतृत्व अपूर्वा सामंत यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे स्वागत केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या स्वागतासाठी चीपी विमानतळावर अपूर्वा सामंतांची उपस्थिती
