विविध योजना अंतर्गत एकाच दिवशी 50 लाखांचे कर्ज वाटप
राजन लाड / जैतापूर
राजापूर तालुक्यातील युनियन बँक नाटे यांच्या वतीने नाटे ग्रामपंचायत कार्यालय येथे महा लोन वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला नाटेचे लोकनियुक्त सरपंच संदिप बांदकर , युनियन बँकेचे राजापूर तालुका समन्वयक अनिल करगुटकर, नाटे शाखेचे व्यवस्थापक किशोर उगले, बँक अधिकारी सुरज, इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधी नेहा नाटेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर व्यवस्थापक किशोर उगले यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. प्रस्ताविकामध्ये बँक अधिकारी सुरज यांनी बँकेच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. महा कर्जवाटप मेळाव्यामध्ये स्वयंसहायता महिला बचत गट, विश्वकर्मा योजनेअंतर्गत, तसेच मुख्यमंत्री रोजगार योजना आदी योजना अंतर्गत 50 लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीचे पत्र लाभार्थींना देण्यात आले.
या लोन वाटप मेळाव्यासाठी श्री संजय मंडळ रिजनल हेड कोल्हापूर , शेतकी विभाग कोल्हापूरचे विजय चौगुले यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे बँकेच्या वतीने या महा लोन वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या लोन वाटप कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती प्रधानमंत्री जीवन सुरक्षा अटल पेन्शन या सामाजिक सुरक्षा योजनांबरोबरच कृषी कर्जाविषयी माहिती देण्यात आली. नाटे येथील व्यावसायिक उमेश उर्फ बंड्या चव्हाण यांना विश्वकर्मा योजनेअंतर्गत पहिले मंजुरीचे पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी सरपंच संजय बांदकर, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मिराशी, पत्रकार राजन लाड, श्रीमती आडीवरेकर, साक्षी राणे, निलेश बांदकर आदींसह बँक कार्यक्षेत्रातील स्वयंसहाय्य गटांच्या महिला, व्यावसायिक आणि बँकेचे ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन लाड यांनी केले.