यूट्यूबर, सोशल मीडिया, रिल्सच्या माध्यमातून वाढला होती पर्यटकांचा ओघ
स्थानिकांना मिळत होता रोजगार
रत्नागिरी:- रत्नागिरी मिऱ्या येथे गेली 5 वर्षे पडून असलेल्या बसरा स्टार जहाज (Basara Star Ship) आता भंगारात निघणार असल्याने येथील स्थानिक नागरिकांचा रोजगार बुडणार आहे. या ठिकाणी अनेक युटूबर, रीलस करणारे तरुण तरुणी यांचा ओढा वाढला होता. त्यामुळे या जहाजाची सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर प्रसिद्धी झाली होती. हे जहाज पर्यटकांना भुरळ घालत होते. दरदिवशी शंभर ते सव्वाशे पर्यटक,तरूण-तरूणीं येथे भेट देतात तसेच फोटोग्राफी आणि त्याठिकाणी रिल्स देखील बनवतात. यामुळे साहजिकच या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत होती. या होणाऱ्या गर्दीने तेथील स्थानिकांना रोजगार मिळाला होता. त्याठिकाणी शहाळी विक्री, नाष्टा, पेय, तसेच शाकाहारी, मांसाहारी जेवण सुविधा अशा माध्यमातून हा रोजगार उपलब्ध झाल्याने भंगारात जाणारे जहाज रोजगाराला चालना देणारे ठरले होते. पण आता भंगारातून त्या जहाजाची विक्री होणार असल्याने स्थानिकांसाठी निर्माण झालेल्या रोजगाराला देखील ब्रेक लागणार आहे बोलले जात आहे.Basara Star Ship
हे ही वाचा:- Basara Star Ship : रत्नागिरीत अडकलेले तब्बल ३५ कोटींचे जहाज काढणार अवघ्या २ कोटीत भंगारात
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात बसरा जहाज सापडल्याने दुबईहून मालदिवला जात असताना 3 जून 2020 रोजी अरबी समुद्रात भरकटलेले हे जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या किनारी येऊन धडकले आणि आजही तेथेच अडकून आहे. येथील मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे 35 कोटींचे हे जहाज दोन कोटींमध्ये भंगारात काढले जाणार आहे. याबाबत एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर सीमाशुल्क, मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. 500 मेट्रिक टन वजनाचे हे जहाज आहे.

Basara Star Ship या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाजामुळे मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले आहे. त्यामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली. त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. पण त्या घडल्या घटनेनंतर आजही त्या जहाजाचा कॅप्टन आणि एक खलाशी अजूनही या परिसरात भाडयाने वास्तव्यास आहेत.
हे ही वाचा:- रत्नागिरी मिऱ्या येथे 6 वर्षे बंद असलेले ‘बसरा स्टार’ जहाज ठरतेय बंधाऱ्याच्या कामात अडसर
हे जहाज काढण्याबाबत दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला आहे. त्यांनी 40 लाखांची कस्टम ड्यूटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. कन्सल्टंट कंपनीने तसेच पत्रव्यवहार सुरू केला आहे. केंद्र शासनाची भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचे मूल्यांकन करणार आहे.Basara Star Ship