रत्नागिरी:- रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्यातर्फे मुस्कान २०२५ ही खेळणी संकलन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.रत्नागिरीमधील अनेक अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना खेळायला पुरेसे साहित्य नाही. प्रत्येकाच्या घरी काही खेळणी सुस्थितीत असूनही ती पडून असतात. अनेकदा अशा खेळण्यांचे करायचे काय, हा प्रश्न पडतो. अशी वापरण्यायोग्य जुनी किंवा नवीन खेळणी रोटरी क्लबतर्फे संकलित करण्यात येणार आहेत. ती खेळणी शाळेतील गरजू मुलांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.
खेळणी जमा करण्यासाठी पत्ता आणि संपर्क असा – वामन सावंत, साई फर्निचर्स, पाटबंधारे ऑफिससमोर, डी-मार्टशेजारी, एमआयडीसी, रत्नागिरी (94226 31253).
येत्या शनिवारी, २२ फेब्रुवारीपूर्वी खेळणी जमा करावीत, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष हिराकांत साळवी (94211 37829) यांनी केले आहे.