रत्नागिरीत महिला उद्योजक कार्यशाळा, टाटा कंपनीकडून ब्रँड नेम देण्याची तयारी
रत्नागिरी:-व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे राहु इच्छिणाऱ्या महिलांसाठी रत्नागिरी उद्योजक कार्यशाळा पार पडल़ी. यावेळी प्रमुख पाहुणे असलेले दीपक ग्रदे यांनी महिलांना मार्गदर्शन केल़े. बदलत्या काळानुसार व्यवसाय वाढीचे मार्ग बदलेले आहेत़. फोन, इंटरनेट या माध्यमांचा प्रभावी वापर करुन आपली बाजारपेठ वाढविता येऊ शकत़े. यासाठी डिजिटल साक्षर होण्यावर भर द्या, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, असे मागदर्शन गद्रे यांनी यावेळी केल़े.
भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद व टाटा कम्युनिकेशन यांच्या माध्यमातून महिला उद्योजकांसाठी मारुती मंदिर येथील हॉटेल विवा येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, जिल्हा बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक एऩ जी जाधव, बँक ऑफ इंडियाचे मार्केटिंग मॅनेजर धीरज मोरे, उद्योजक केशव भट, राजेंद्र सावंत, भारतीय उद्योजकता विकास संस्थेचे प्रकल्प संचालक ड़ॉ. प्रकाश सोलंकी, प्रकल्प अधिकारी दत्तात्रय परुळेकर आदी उपस्थित होत़े.
पुढे गद्रे म्हणाले, व्यवसाय करताना महिलांनी आपल्याला काय येतं यापेक्षा काय येत नाही याकडे लक्ष दिले पाहिज़े थोडया यशाने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेव़ा. स्वत:ला कधीही कमी समजु नका आणि कुणाकडे याचक म्हणून देखील जाऊ नक़ा, आपल्या कतृत्वावर विश्वास ठेव़ा. कोकणातील महिलांकडे गुणवत्ता आहे. काही तरी करून दाखविण्याची तयारी ठेवलीत तर यश तुमचेच असेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात आजगेकर यांनी महिलांना देण्यात येणाऱ्या सवलतींची माहिती दिल़ी. तसेच व्यवसाय करण्यासाठी लागणारे सर्वतोसहकार्य करण्याची शासनाची तयारी असल्याचे सांगितल़े. चेंबर ऑफ कॉमर्स रत्नागिरीचे सचिव केशव भट म्हणाले की, महिलांनी मोठी स्वप्न बघायची तयारी ठेवली पाहिज़े. केवळ मी घर संभाळून दोन तास काम करेन, फावल्या वेळेत काम करेन अशाने व्यवसायवाढीवर मर्यादा येतात़. आपण जे तयार करतो त्याचे ब्रँडिंग करणे महत्वाचे आह़े. वस्तूचा दर्जा निर्माण केल्यास त्याचा फायदा होऊ शकेल़. आताच्या काळात मोठी बाजारपेठ तुमची वाट पाहत आह़े. नवरा-बायको दोघांनी काम करणारी ही पिढी आह़े. त्यामुळे रेडिमेड वस्तू खरेदी करण्यावर भर दिला जात़ो. त्यामुळे बाजारात मोठी मागणी आहे फक्त आपण पुरवठा करण्यास कमी पडत आहोत़ यावर मात करण्यासाठी सर्व महिला उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन भट यांनी केल़े.
टाटा कंपनीकडून ब्रँड देण्याची तयारी
भारतीय उद्योजकता विकास संस्थेचे प्रकल्प संचालक ड़ॉ प्रकाश सोलंकी यांनी सांगितले की, महिलांनी तयार केलेल्या वस्तु व उत्पादनांना टाटा कंपनीकडून ब्रॅंडिंग करण्याची तयारी दर्शविण्यात आली आह़े. ही महिलांसाठी खूप मोठी संधी असणार आह़े. या संधीचा लाभ उठवून महिलांनी आपला व्यवसाय वाढवाव़ा. भारतातील महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी आपली संस्था काम करत़े. आतापर्यंत 1 हजार 500 हुन अधिक महिलांनी प्रशिक्षण घेतले आह़े. त्यापैकी 760 महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून 850 महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. ही समाधानाची बाब म्हणता येईल़ रत्नागिरीचा विचार करता भौगोलिकदृष्टया व्यवसाय सुरू करण्यासाठी आव्हानात्मक असा जिल्हा आह़े असे असले तरी याठिकाणी महिलांमध्ये गुणवत्ता आहे तसेच व्यवसायासाठी बाजारपेठ देखील उपलब्ध आह़े ही जमेची बाब म्हणता येईल़.
कार्यक्रमाला दिलीप हरिहर, निलेश धमाले, प्रकाश पुरावणे, ममता नलावडे, कांचन चांदोडकर, अमोल पाटणे, तुषार आंग्रे, ऋषिकेश रसाळ, माधुरी कळंबटे, अनंत आगाशे, तनया शिवलकर, सचिन माजलकर, शशिकांत धानोरकर तसेच मोठया संख्येने महिला उद्योजक, बचत गटांच्या महिला आदी उपस्थित होत्य़ा.