नांदेडमध्ये 21 ते 23 फेबुवारी रोजी होणार स्पर्धा
रत्नागिरी:-नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 30 खेळाडूंची निवड झाली आहे. 21 ते 23 फेबुवारीपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. स्पर्धकांचा चमू आता पनवेल येथे पोहोचला असून याठिकाणी होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरानंतर नांदेड येथे रवाना होणार आहेत.
मंडणगड तालुक्यातील रुक्साना मुल्ला, मयुर बाईत, सुरज गायकवाड, दापोलीमधून अजित निकम, चिपळूण तालुक्यातून अश्विन गवळी, किरण राठोड, अनिल जाधव, शिल्पा शृंगारे, सेजल पोलादे, उमेश राजेशिर्के, हरीश वाघमारे, गुहागर तालुक्यातून प्रीती रेवाळे, संगमेश्वर तालुक्यातून सोहन वीर, द्वारकेश तायडे, स्निग्धा गावडे, आत्माराम मुरकुटे, पवन राठोड, आकाश वावरे, रत्नागिरी तालुक्यातून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सुनील किर, अभिजीत शेटये, माधवी लिंगायत, कविता ढेपे, नेहा कांबळे, मीनाक्षी कदम, अमोज झोरे, कुमार जाधव, सरफराज संदे, क्रांती खेडेकर, सौरभ जाधव, राकेश विलणकर, गणेश वावरे, सुरज कांबळे, कमलेश लाड, नागेश जाधव, मयूर पानसरे, अभिजीत झोरे, अजित विलणकर, सिकंदर मयेकर, सचिन पाटिल, मनोहर रावते, संदीप सावंत, राजश्री ऐवळे, लांजा तालुक्यातून सुरेंद्र भोजे, गणेश पवार आणि राजापूरमधून स्वप्नील गराटे आदींची निवड झाली आहे.