खेड : तालुक्यातील खोपीनजीक गांजाची वाहतूक करताना पोलीस पथकाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एकाला रंगेहाथ पकडले. संशयिताकडून पोलिसांनी 2 किलो गांजा जप्त केल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
खोपीनजीक गांजाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर व पथकाने सापळा रचला. या सापळयात गांजाची वाहतूक करणारा अलगद सापडला. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून पांचनाम्याचे काम सुरू होते. संशयितांनी हा गांजा नेमका कुठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याबाबतचा पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सखोल तपास सुरू होता. गांजा वाहतुकीसह विक्रीचे नेमके कनेक्शन उघड करण्यासाठी पोलिसांकडून साऱ्या शक्यतांचा पडताळा करण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकणी, अफ्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.