श्रीवर्धन/संदीप लाड:- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाच्या अनुषंगाने दिनांक 17/02/2025 रोजी 16.00 ते 17.00 श्रीवर्धन पोलिस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक – बाजार पेठ – दादरी पुल – मोगल मोहल्ला – जिनगर मोहल्ला- कासिम राऊत चौक – बाजारपेठ – नवी पेठ ते मेटकर्णी एस. टी.स्टँड असा रूट मार्च घेण्यात आला. तसेच एस.टी.स्टँड श्रीवर्धन येथे दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली.
सदर रूट मार्च व दंगा काबू योजना रंगीत तालीम करीता उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीवर्धन सविता गर्जे मॅडम, पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे उपनिरीक्षक प्रदीप राठोड, उपनिरीक्षक श्री लहाने महिला उपनिरीक्षक करंजकर मॅडम व स्टाफ तसेच म्हसळा पोलीस ठाण्याचे पोसई रोहिणकर व 5 पोलीस अंमलदार, दीघी सागरी पोलिस ठण्याचे पोसई शेख व 5 पोलीस अंमलदार तसेच आरसीपी प्लाटून माणगाव चे 30 अंमलदार हजर होते.