रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची स्लिंगबॅग चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल असा १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.
लांजा पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२४ ला सकाळी साडेचारच्या सुमारास वेरवली रेल्वेस्टेशन दरम्यान घडली. फिर्यादी महिला व तिचे पती आणि दोन मुले मुंबई ठाणे ते उडपी (कर्नाटक राज्य) असे मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत होते.
कोकण रेल्वेच्या वेरवली रेल्वेस्टेशन येथे गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली असताना चोरट्याने फिर्यादी महिला, पती व मुले झोपली होती. या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या सीटजवळ असलेली स्लिंगबॅग चोरट्याने पळवली.
मंगलोर एक्स्प्रेसमध्ये महिलेची स्लिंगबॅग पळवली, दीड लाखाचे नुकसान
