चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-ठाणे येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत खेड-रत्नागिरी येथील मिनल इनरकर यांच्या अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून जैनब अब्रार मणियार Z 2 कॅटॅगिरीतून भारतात चौथी आली आहे. सिया संकेत टेलर Z2 कॅटॅगिरी उत्तेजनार्थ, आरव विवेक सूर्व D2 कॅटॅगिरी उत्तेजनार्थ, विश्व उत्तमकुमार जैन D1 कॅटॅगिरी उत्तेजनार्थ, आराध्या रत्नेश नातुसकर Z3 कॅटॅगिरी, रिजनल अचीवर असे क्रमांक मिळाले आहेत.
२०१८ पासून अॅबॅकस अॅक्टीवीटी सेंटर सुरू असून तेव्हापासून मार्गदर्शन चालू आहे. यामुळे मुलांच्या बौध्दीक क्षमतेचा विकास होतो. मुले कॅलक्युलेटर पेक्षाही जलदरित्या कॅलक्युलेशन करतात. ऑनलाईन आणि ऑफलाइन क्लास चालू असतात. खेड दापोलीपासून विद्यार्थ्यांना मागदर्शन खेड स्वरूपनगर येथे हे अॅक्टीविटी सेंटर आहे.