चिपळूण (प्रतिनिधी):- तालुक्यातील प्रसिद्ध डॉ. तात्यासाहेब नातु कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हाने हे आपल्या विद्यार्थ्यांकरीता विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. महविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता औद्योगिक भेट (Industry Visit) चे आयोजन करण्यात आले. सदर औद्योगिक भेट ही दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पार्ले उद्योग अंबरनाथ येथे झाली.
या ठिकाणी सर्व प्रथम विद्यार्थ्यांना एका विडियो मार्फत पार्ले उद्योग समूहाचा इतिहास, पार्ले उद्योगाचे विविध पदार्थ यांची माहिती देण्यात आली. सदर कारखान्यामध्ये बिस्कीट चे उत्पादन केले जाते. यामध्ये देशांतर्गत उत्पादन व निर्यातीकरीता उत्पादन असे उत्पादन केले जाते. या कारखान्यातून दररोज ७५-१०० टन बिस्किट चे उत्पादन होते. कारखान्यात २५० कामगार काम करत असतात. अशी माहिती कारखान्याचे शाळा समन्वयक निशिकांत पाठक यांनी दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कारखाना दाखवण्यात आला. यामध्ये उत्पादन, पॅकिंग, विविध यंत्रे, उत्पादनाची साठवण यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. सदर कारखान्याचे मालक विनोद जसनानी आणि स्वाती शिंदे (HR Manager Pune Plant) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामध्ये एकूण ३८ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
सदर उपक्रमा दरम्यान जीबीके समूहाचे अभिजीत करनजुले पाटील यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाचे नियोजन स.प्रा. शाहरुख चोगले आणि स.प्रा. वर्षा बोभस्कर आणि वाणिज्य विभाग यांनी केले. सदर उपक्रम संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.