रत्नागिरी:- जिल्हय़ातील राजकीय उलथापालथींमध्ये दापोली नगर पंचायतीमध्येही शिवसेना उबाठाला खिंडार पडणार आहे. येथील पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला असून या नगरसेवकांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला त्याबाबतो पत्रही सादर केले.
दापोली नगर पांयतीमध्ये वेगळा गट स्थापन करणाऱया त्या नगरसेवकांमध्ये विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके, अश्विनी लांजेकर यां समावेश आहे. हे पाचही नगरसेवक आज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पाही नगरसेवकांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेना उबाठात प्रवेश केलेला होता.
दापोली नगर पांयतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये हे पाही जण निवडून आले होते. वॉर्डातील विकास ठप्प होता, विकासकामे होतील यासाठी या नगरसेवकांनी उबाठात प्रवेश केला. पण विधानसभेला उबाठा पराभव झाल्याने आमी निराशा झ्घल्यो विलास शिगवण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आता नगर पांयतींमध्ये वॉर्डातील विकासकामांसाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्यो विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके, अश्विनी लांजेकर यांनी सांगितले. त्यासाठी वेगळा गट स्थापन केला आहे. सोमवारी यांनी जिल्हा प्रशासनाला पत्रही दिले.