चिपळूण – येथील चिपळूण स्पोर्ट्स अकॅडमी गेली २० वर्षे शिवजयंती चे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध गड – किल्ल्यावरून शिवज्योत आणणार आहेत.आतापर्यत
शिवनेरी गड,राजगड ,तोरणा ,लोहगड ,हरीहर गड,तिकोणा प्रतापगड ,माऊली गड ,सिंहगड हरिश्चंद्रगड इत्यादी ठिकाणांहून ज्योती आणण्यात आली आहे.
यावर्षी वर्षे २१ वे वर्ष आहे .यावर्षी किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यासाठी मावळे रवाना झाले आहेत. या मोहिमेचा शुभारंभ चिपळूण मधील भैरीच्या देवळात चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन श्री मोहन मिरगल, चिपळूण स्पोर्ट्स अकॅडमी चे खजिनदार जयंत चितळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सोमवारी करण्यात आला.
चिपळूण स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष मंगेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार कानापडे, सतीश कदम, निलेश कदम,योगेश शिंदे, अभिजित बुरटे, शुभम बडबे, रोहित बारे, , आशिष कानापडे, रणजित लोलम, ओम हरवडे, गणेश राठोड, राहुल तांदळे, स्वर्णीत कानापडे, विशाल मोहिते, पंकज आग्रे, दिगंबर शिंदे, आयुष्य भैरवकर , गोकुळ भैरवकर , मयुरेश घडशी, ओमकार सुतार,आदित्य गमे, प्रितम मुकनाक,साहिल सुर्वे,भाऊ कदम,शेखर तटकरे,रूतवेश बुरटे, संकेत भुवड आदी सहभागी झाले आहेत.