रत्नागिरी:-रेवस रेडी सागरी महामार्गावरील पुलांच्या कामाचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून रेवस ते रेडी सागरी महामार्गावर होणाऱ्या पुलांची माहिती यावेळी महामार्ग विभागातर्फे देण्यात आली.
ती अशी – रेवस ते कारंजा धरमतर खाडीवर चौपदरी मोठ्या खाडी पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याची लांबी 10.209 कि.मी. असून त्याकरिता 3 हजार 57 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
केळशी खाडीवरील 0.670 कि. मी. लांबीच्या मोठ्या पुलाच्या बांधकामाकरिता 148.43 कोटी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
आगरदंडा खाडीवरील 4.31 कि.मी. लांबीच्या मोठ्या पुलाकरिता 1315.15 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
अन्य पुलांची माहिती अशी – कुंडलिका खाडीवरील रेवदंडा ते साळाव पुलाचे बांधकाम – 3.829 कि.मी. लांबी, प्रशासकीय मान्यता 1736.77 कोटी. बाणकोट खाडीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम – 1.711 कि.मी. लांबी, प्रशासकीय मान्यता 408.34 कोटी. दाभोळ खाडीवर 2 पदरी मोठ्या खाडी पुलाचे बांधकाम – 2.876 कि.मी. लांबी, 798.90 कोटी. जयगड खाडी पुलाचे बांधकाम – 4.391 कि.मी. लांबी, प्रशासकीय मान्यता 930.23 कोटी. काळबादेवी येथील खाडी पुलाचे बांधकाम – 1.854 कि.मी. लांबी, 453.23 कोटी प्रशासकीय मान्यता. कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम – 1.580 कि.मी. लांबी, 257.47 कोटी प्रशासकीय मान्यता.
काळबादेवी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेनुसार काम करण्यास प्राधान्य द्यावे, असे पालकमंत्री म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग 166, महिला बचत गट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा नियोजन समितीबाबत खर्च आढावा देखील पालकमंत्री श्री. सामंत यांनी घेतला.