व्यावसायिक व शेतीविषयक होणार मार्गदर्शन
चिपळूण (वार्ताहर) : बळीराज सेनेच्या वतीने गुहागर पाटपन्हाळे येथे दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता बळीराज सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, व्यवसायिक मार्गदर्शन व महिला हळदी कुंकू समारंभ असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बळीराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वालम यांच्या हस्ते होणार आहे.
राजकीय पटलावर नव्याने स्थापन झालेल्या बळीराज सेना या पक्षाने कमी कालावधीमध्येच संपूर्ण महाराष्ट्रभर आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक पक्षातील लोक या बळीराजासेनेमध्ये सामील होत आहेत. बळीराज सेनेचे संपर्क कार्यालय गुहागर तालुक्यात व्हावा आणि जनतेशी थेट संपर्क करता यावा यासाठी रविवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पक्षप्रमुख अशोक वालम यांच्या हस्ते बळीराज सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात महिला बचत गट, गृह व लघुउद्योग, व्यावसायिक बिनव्याजी कर्ज, शेतीविषयक माहिती अशा व्यावसायिक विषयांवरती मार्गदर्शन सुद्धा केली जाणार आहे. समाजातील तळागाळ्यातील घटकांना जागृत करत सामाजिक आणि राजकारण या दोन्ही विषयावरती यावेळी संवाद साधला जाणार आहे . या कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे सरचिटणीस कृष्णा वणे, लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ, उपाध्यक्ष सुरेश भायजे, सरचिटणीस नंदकुमार मोहिते, प्रकाश तरळ, संभाजी काजरेकर, युवा नेते अँड विनेश वालम, उपनेते दत्ताराम घोगले, राजाराम ढोलम, रमेश कानावले, ॲड चंद्रकांत कोबनाक, सचिव मुंबई उपनगर बबन कांबळे, ग्रामपंचायत पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, शरद बोबले आणि चिपळूण तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत कोकमकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गुहागर विधानसभा बळीराज सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.