मुंबई: मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “भास्कर जाधव यांना त्यांच्या स्टेटसमधून त्यांचा म्होरक्या धाडसी नाही, हे सांगायचे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर काम करणे आता अशक्य आहे, ही भास्कर जाधवांची मानसिकता झाली आहे.
हे त्यांनी वारंवार सुचवले आहे. त्यामुळे इतर लोक त्यांच्या विनवण्या करत आहेत. पण ते त्यांचे ऐकणार नाहीत. भास्कर जाधव माझे मित्र आहेत.
त्यांचा स्वभाव मी जाणतो. एकदा घेतलेल्या निर्णयापासून ते मागे हटणार नाहीत. त्यामुळे त्यांचा आता म्होरक्यावर विश्वास राहिला नाही. पुढील महिनाभरात अधिवेशनात फार मोठे बदल झालेले दिसतील, हे मी खात्रीपुर्वक सांगतो. भास्कर जाधव चांगले, अभ्यासू आणि स्पष्ट बोलणारे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी आता मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघांच्या कळपात या,” असे विधान त्यांनी केले. त्यामुळे संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.