पाचल/नितिश खानविलकर:-राजापूर तालुक्यातील तळवडे येथील रहिवासी, सरस्वती विद्यांदिर पाचलचे निवृत्त शिक्षक, व्यासंगी वाचक प्रभाकर पंडित यांच्या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता ग्राम सचिवालय पाचल येथे करण्यात येणार आहे.
कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचलच्या वतीने ‘स्मृतींना ऊजाळा’ स्मरणिकेचे प्रकाशन झाल्यावर त्याच कार्यक्रमात प्रभाकर पंडित यांच्या ‘आठवणींच्या सहवासात’ या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यापूर्वी पंडित सर यांनी अर्जुना काठ, आम्ही वारकरी, कथा कल्पतरू ही तीन पुस्तके लिहून प्रकाशित केली आहे. पंडित सर हे खूप वर्षापासून नारकर वाचनालयाचे व तळवडे ग्राम वाचनालयाचे सभासद आहेत. या दोन्ही वाचनालयातील पुस्तकांची मला पुस्तके लिहिताना खूप मदत झाली. म्हणूनच पाचल वाचनालयाच्या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात माझ्याही पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार असून या कार्यक्रमाला पुस्तक प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन लेखक पंडीत सर यांनी केले आहे.
प्रभाकर पंडित यांच्या 4 थ्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
