नराधमाविरोधात गुन्हा दाखल, शोध सुरू
राजापूर : तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय गतिमंद तरुणीवर अत्याचार करून ती गरोदर राहिल्याची घटना घडली आहे. दरम्यान याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मुलगी गतिमंद असून तिच्या असहाय्यतेचा अज्ञाताने गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर ती काही आठवडयाची गरोदर राहिली. यानंतर सारा प्रकार समोर आला. पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर राजापूर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कुणालाही अटक झालेली नसून पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे अधिक तपास करीत आहेत.