लांजा:-तालुक्यातील भांबेड येथील महावितरण कंपनीचे सबस्टेशन बाजूला स्पार्क झाल्याने आग लागल्यामुळे आजुबाजूचा परीसरासह अभिजीत गांधी याची काजू कलमाची बाग महावितरण कंपनीची ३३ केव्हीची वायर जळुन मोठे नुकसान झाले असून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राजापूर येथून अग्निशमन बंब बोलवण्यात आले. परंतु बंब येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने सर्व काही जळुन खाक झाले होते.
या अगोदर लांजा तालुक्यातील खोरनिनको, प्रभानवल्ली, पालु-चिंचुर्टी येथे आगीच्या घटना ताज्या आहेत. तसेच या आधी लांजा तालुक्यातील काही ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अशातच १६ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता भांबेड येथील सबस्टेशन बाजूला स्पार्क झाल्याने आग लागल्याचे समजले. तसेच आजुबाजुला असणाऱ्या गवताने देखील पेट घेतला.
आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राजापूर येथून अग्निशमन बंब बोलवण्यात आला होता. दुपारी एक वाजता बंब सबस्टेशन भांबेड येथे दाखल झाला. माल पट्टी आणि गवत असल्याने हाहा म्हणता आगीने रौद्र रूप धारण केले. तसेच बाजुला असलेल्या अभिजीत गांधी यांची काजुची बाग जळून खाक झाली. बंब पोहचण्याआधीच सर्व काही जळून खाक झाले यामध्ये गांधी यांची काजूची बाग आगीच्या भक्ष्य स्थानी पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी घटना स्थळी महावितरण कंपनीचे अधिकारी, माजी नगरसेवक राजू हळदणकर, ग्रामस्थ उपस्थित होते.
अग्निशमन बंब असता तर आगीपासून होणारे नुकसानीचा बचाव करता आला असता असे बोलले जात असून लांजा तालुक्यासाठी एखादा बंब नसावा हेच तालुक्यातील जनतेचे दुर्दैव असल्याचे बोलले जात आहे.