गुहागर (प्रतिनिधी)- वाचन संस्कृतीचे जतन करणे काळाची गरज आहे कारण वाचन हे अभ्यासक्रमाचा पाया आहे. वाचन संस्कृती वाढवणे ही मुलांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि शैक्षणिक यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
शिक्षकांचेही वाचन प्रगल्भ असावे वाचनाने विचारांची उंची वाढते वैचारिक समृद्धता अंगी येते पुस्तकांचं ग्रंथालय प्रत्येकांच्या घरात असावं वाचन संस्कृती जोपासण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी काम करणं अत्यंत गरजेचं असल्याची भावना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एम. कासार यांनी व्यक्त केली.
लोकशिक्षण मंडळाच्या आबलोली महाविद्यालयात आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी २.० प्रशिक्षणाच्या निमित्ताने गुहागर तालुक्यातील प्रशिक्षणार्थी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री बी.एम. कासार साहेब पुढे म्हणाले की,ज्या क्षेत्रात यश मिळावायचं असेल त्या क्षेत्रात झोकुन देऊन काम केले पाहिजे. सराव रियाज याला आयुष्यात महत्वाचे स्थान असावे शिक्षकांनी आपल्या चांगल्या विचारांचा आनंद विद्यार्थ्यांना व समाजाला द्यावा प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवे विचार नवी प्रेरणा घ्यावी सृजनशील विचारांना चालना मिळावी. विद्यार्थांच्या मुलभुत क्षमता वृद्धीकडे लक्ष द्यावे दर्जेदार अध्यापनानातुन समृद्ध विद्यार्थी घडावे प्रत्येक अध्ययन अनुभव शैक्षणिक साहित्याने जोडला जावा,जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे आमुलाग्र बदल,नवनवीन संशोधनाचा विचार करता आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे ही काळाची गरज असून शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात वाहून घेऊन गुणवत्ता विकासासाठी कार्यरत रहावे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणे हे आपले ध्येय असून जागतिक विचार करणारे आणि जगाला दिशा देणारे सक्षम नागरिक घडावेत यासाठी आपण कटिबद्ध राहायला हवे ,क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन, मूल्यमापन व मूल्यांकन करून प्रशिक्षणाप्रमाणे यापुढे कार्यवाही व्हावी असेही ते म्हणाले सर्व प्रशिक्षण वर्गास भेटी देऊन प्रशिक्षणार्थींशी हितगुज साधत सुरू असलेल्या गटकार्यांची पाहणी करून कौतुकही केले.
शिक्षणाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी संदेश कडव साहेब ,कार्यक्रम अधिकारी रविंद्र कांबळे साहेब,गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास खर्डे साहेब पंचायत समितीचे विषयतज्ञ, गुहागर तालुका प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी , प्रशिक्षणाचे सर्व प्राथमिक, माध्यमिक तज्ञ मार्गदर्शक व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.त्यावेळी गुहागर तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी बी एम कासार उपशिक्षणाधिकारी संदेश कडव व अन्य मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.