चिपळूण:-शहरातील भोगाळे येथील 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पोफळी येथे घडली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नेंद करण्यात आली आहे. अजय कृष्णा कदम (24, भोगाळे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कदम हा पोफळी येथे उरुसासाठी गेला होता. त्या ठिकाणी तो तोंडावर पडलेल्या स्थितीत आढळून आला. तो हालचाल करत नसल्याने त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून त्याला कामथे रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यानी तपासून अजय याला मृत घोषित केले.