रत्नागिरी:-तालुक्यातील हातखंबा तिठा येथील अलंकार हॉटेल समोरील रस्त्यावर दुचाकी घसरुन महिला ट्रकखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. तैसिरा अमीन हिसब (26, ऱा मुंबई, सध्या वडवली ता.लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमीन हिसब हा मुंबईला रहातो. दोन ते तीन वर्षापुर्वी या दोघांचा विवाह झाला होता. अमीन काही दिवसापूर्वी मुंबईहून वडवली येथे गावाला आला होता. रविवारी पत्नी तैसिरा हिच्यासह दुचाकीवरुन लांजाहून रत्नागिरीकडे येत होता. हातखंबा तिठा येथील रस्त्यावर आला असता त्यांच्या दुचाकीच्यामागून एक ट्रक जात होता. ट्रक दुचाकीच्या जवळ घेतल्याने स्वाराचा काँक्रिट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी घसरुन अपघात झाला. यावेळी दोघेही दुचाकीवरुन पडले असता उठेपर्यंत मागून येणारा ट्रक पत्नीच्या अंगावरुन गेला. त्यात ती गंभीर जखमी झाली निपचित पडली. अमीन हा देखील जखमी झाला. तैसिरा व अमीन यांना तेथील ग्रामस्थांनी तात्काळ रिक्षा टेम्पोने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तैसिराचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगितले. या अपघाताची ग्रामीण पोलिसांना खबर देण्यात आली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे