रत्नागिरी:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांची प्रभारी रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख पदावर निवड केली.त्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.
शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात शिवसेना जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा सत्कार प्रभारी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी तालुका महिला संपर्क संघटक सौ. वर्षा पितळे, उपतालुका प्रमुख विजय देसाई, युवासेना तालुका अधिकारी प्रसाद सावंत, किरण पडवळ, विभागप्रमुख प्रशांत सुर्वे, सलील डाफळे, अमित खडसोडे, मयूरेश पाटील, निखिल बने, पारस साखरे, अनिशा नागवेकर, अरुण नागवेकर, संतोष लिंगायत, समीर आखाडे उपस्थित होते.