रत्नागिरी : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे 29 वे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 14, 15 व 16 फेब्रुवारी 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आयोजित केले आहे.
या अंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा प्रकारात दैदिप्यमान कामगिरी केली आहे.यामध्ये क्रिकेट (सर्वसाधारण) पुरुष – विजेते पद, क्रिकेट पुरुष( 45+) उपविजेते पद ,व्हॉलीबॉल विजेते पद, क्रिकेट महिला उपविजेता पद , बॅडमिंटन महिला विजेते पद , कॅरम एकेरी महिला विजेते पद , कॅरम दूहेरी महिला विजेते व उपविजेते पद , कॅरम मिश्र उपविजेते पद , 200 मी.धावणे विजेते पद, 400 मी. धावणे उपविजेटा पद,लांब उडी विजेता पद,कॅरम दुहेरी उपविजेते पद यांसारख्या पदकांच्या भरघोस कमाईमुळे ‘जिल्हा परिषद जनरल चॅम्पीयनशिप (सर्वसाधारण विजेतेपद) कायमस्वरूपी फिरता चषक’ सलग या वर्षीही आरोग्य विभागाने पटकावला आहे.मा.ना.डॉ.उदय सावंत ,उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांचे शुभहस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार आणि सर्व खातेप्रमुख यांनी विशेष अभिनंदन करून सर्वांच्या उपस्थितीत ‘जिल्हा परिषद जनरल चॅम्पीयनशिप (सर्वसाधारण विजेतेपद) कायमस्वरूपी फिरता चषक’ आरोग्य विभागाला प्रदान कण्यात आला.