मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजाच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा
लांजा( प्रतिनिधी) गेल्या नऊ वर्षांपासून तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा या संस्थेचा दहावा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या निमित्ताने लांजा बागेश्री शाळेला स्मार्ट टीव्ही भेट व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा च्या वतीने दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.बागेश्री शाळेत आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला.लांजा बागेश्री शाळेला स्मार्ट एज्युकेशनसाठी असलेली स्मार्ट एलईडी टीव्हीची गरज लक्षात घेऊन
संस्थेचे संस्थापक अकिल नाईक यांनी आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे निमित्त शाळेला स्मार्ट टिव्ही देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आज शाळेला हा स्मार्ट टिव्ही देण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे जिजाऊ संस्थेच्या वतीने मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अकील नाईक, रत्नागिरी तालुका अध्यक्ष समद सोलकर, उपाध्यक्ष नाझिम मजगावकर सचिव राजू नाईक, महिला अध्यक्ष निकहत डिंगणकर, कोअर कमिटी सचिव वृंदा बोरकर, लांजा तालुका युवा अध्यक्ष अकिब मुजावर, दिव्यांग कमीटी अध्यक्ष शगुफ्ता नाईक, रत्नागिरी तालुका युवाध्यक्ष शारिक वाडकर, सल्लागार अजीम मुजावर तसेच जिजाऊ सामाजिक संस्था लांजा तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा आग्रे, तसेच शिक्षण तज्ज्ञ मारुती गुरव, गजानन गुरव, शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पाटील, उपशिक्षिका सुषमा पाटोळे आणि विद्यार्थी वर्ग पालक वर्ग उपस्थित होता.