भारतीय सैन्य दलात एनसीसीच्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. NCC स्पेशल एन्ट्री स्कीम- ऑक्टोबर २०२५ अंतर्गत ही भरती राबवली जात आहे.
यासाठी अर्ज प्रक्रिया भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट https://www.joinindianarmy.nic.in वर देखील सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी १५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि रिक्त जागांसंदर्भातील तपशील जाणून घ्या.
पदांचे नाव आणि माहिती
भारतीय सैन्याची ही भरती NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2025-58 कोर्स अंतर्गत अविवाहित महिला आणि पुरुष एनसीसी उमेदवारांसाठी आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यावरून एनसीसी महिला आणि पुरुषांसाठी किती रिक्त जागा आहेत आणि माहिती तपासू शकतात.
रिक्त जागा – ७६
एनसीसी स्पेशल एन्ट्री पुरुष – ७० पदे
एनसीसी स्पेशल एन्ट्री महिला – ०६ पदे
शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात परंतु त्यांच्या मागील वर्षाच्या निकालात किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे.
याशिवाय, उमेदवारांनी किमान दोन वर्षे एनसीसीमध्ये सेवा दिली असावी. याशिवाय उमेदवारांकडे एनसीसीचे प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे
वयोमर्यादा
१ जुलै २०२५ रोजी पर्यंत उमेदवाराचे वय १९ ते २५ वर्षे दरम्यान असावे.
अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा फी
१) अर्ज प्रक्रिया मोफत आहे उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही,
२) अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी नियुक्त केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
१५ मार्च २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज करावा.
असा करा अर्ज
१) उमेदवारांनी प्रथम भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट https://www.joinindianarmy.nic.in वर जा.
२) यानंतर ऑफिसर एंट्री अॅप्लिकेशन/लॉगिन वर जा आणि नोंदणी लिंकवर जा.
३) ऑनलाइन अर्ज करा लिंकवर जा आणि फॉर्ममध्ये विनंती केलेली माहिती काळजीपूर्वक भरा.
४) आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्मची अंतिम प्रिंटआउट घ्या.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक
(https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx)
अधिकृत वेबसाईट लिंक