गुहागर:-कर्नाल (हरियाणा) येथील गुरुकुलच्या बंदिस्त क्रिडा संकुलात १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ७१ व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १२ सदस्यीय संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधार पदी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील काताळे गावची सुकन्या कु. रेखा रविंद्र सावंत(सद्या शिक्षणासाठी पुणे) हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला कबड्डी स्पर्धेत कर्णधार पदी निवड करण्यात आली आहे.या तीच्या निवडी बद्दल गुहागर तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत असून काताळे पंचक्रोशीत जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतून इराण मध्ये होणा-या आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारताचा महिला संघ निवडण्यात आला आहे अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव बाबूराव चांदरे यांनी पत्रकारांना दिली संघ पुढील प्रमाणे कु. रेखा सावंत कर्णधार, आम्रपाली गलांडे, मंदिरा कोकमकर,सलोनी गजमल, समरिन बुरोंडकर, तसलीम बुरोंडकर,पुजा यादव, प्रणाली नागदेवते, माधुरी गवंडी, ज्यूली मिस्किटा, निकिता पडवळ, दिव्या गोगावले,प्रशिक्षक संतोष शिर्के आणि संघ व्यवस्थापक सोनाली जाधव यांची निवड करण्यात आली आहे.