रत्नागिरी : जिल्ह्यात तरुणांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. प्रेम प्रकरण, नैराश्य, नोकरी, पैसा, ब्लॅकमेलिंग, मोबाईल, कमी कालावधीत जास्त पैसा मिळवणे, आमिष या साऱ्या मोहजाळात तरुणाई अडकली आहे. आपल्या मनासारखं झालं नाही की त्वरित मरणाचा एकमेव मार्ग स्वीकारून जीवन संपवणेचा पुर्याय निवडतात. संगमेश्वर, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण या तालुक्यातून या आठवडाभरात 6 आत्महत्या झाल्या आहे. विशेष म्हणजे या आत्महत्या तरुण / तरुणीनी केल्याचे दिसून येते. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आत्महत्या करणाऱ्यांचे नावे
1) रसिका सनगरे (24, आदिष्टिनगर, रत्नागिरी) – 9 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 वाजता
2) प्रथमेश सनगरे (24, संगमेश्वर, वांद्री ) 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता
3) सुमित सुनील घाणेकर (18, गुहागर, पालशेत) 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता
4) विशाल अशोक पवार (36, तरवळ, बौध्दवाडी, ता. रत्नागिरी) 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता
5) भावना राजकुमार चौधरी (16, कोकण नगर, रत्नागिरी) 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता