स्थानिक कलाकारांनी साकारलेले 2 अंकी ‘हेच माझे दैवत’ या सामाजिक नाटकाचे होणार सादरीकरण
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध आणि आंबेड, कानर कोड मानसकोंड, गावची ग्रामदेवता श्री अंत्राळदेवी मंदिरचा वर्धापन दिन सोहळा 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निमित्त आंबेड बुद्रुक कानरकोंड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 12 : महापूजा, चंडीयाग, सकाळी 9 वाजता : श्री अंत्राळ गंगातीर्थ पूजन, दुपारी 12 ते 1 : महाआरती, भोवत्या प्रदक्षिणा दुपारी एक वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ , दुपारी 1 ते 3 : महाप्रसाद, 3 ते 4.30 : भजन (आंबेड बुद्रुक ग्रामस्थ मंडळ), 4.30 ते 6 : कीर्तन – देवी महात्म्य – ह. भ. प. प्रविणकाका मुळ्ये, सायंकाळी 6 ते 7 : महाआरती, भोवत्या, दीपोत्सव, रात्री 8.30 ते 9 मान्यवरांचे सत्कार, रात्री 9 वा. नमन : श्री अंत्राळदेवी नाटय मंडळ, कानरकोंड व (यशवंत माणके लिखित 2 अंकी सामाजिक नाटक) हेच माझे दैवत नाटक सादर होणार आहे.
स्थानिक कलाकारांनी आपल्या कौशल्यातून हे नाटक साकारले आहे. यामध्ये तीन स्त्री पात्र आहेत. यामध्ये भाग घेणारे कलाकार : किशोर कानर, दीपक गावडे, एकनाथ कानर, निलेश कानर, महेश कानर, निकिता घाग, कल्याणी साखळूणकर, प्रशांत कानर, संतोष गावडे, संदीप गावडे, लवू कानर, श्वेता असे कलाकार सहभागी असणार आहेत. तर निर्माता : ग्रामविकास मंडळ कानरकोंड, पार्श्वसंगीत : योगेश मांडवकर, नेपथ्य, प्रकाश योजना : मंगेश शिगवण, दिलीप शिगवण असणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गावाचे खोत गावकर, मानकरी, तसेच सर्व ग्रामस्थ व ग्रामविकास मंडळ कानर कोंडचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी केले आहे.