रत्नागिरी:-विलास चाळके यांच्या हकालपट्टी नंतर शिवसेना ( उबाठा ) गटाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून शिवसैनिक दत्ता कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विलास चाळके यांची हकालपट्टी करण्यात आल्याच्या निर्णयानंतर अवघ्या काही कालावधीत माजी बांधकाम सभापती दत्ता कदम यांच्या खांद्यावर प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.