मेष : मेहनतीच्या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल
मेष
श्रीगणेश म्हणतात की, मेहनतीच्या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल. चांगली बातमी मिळाल्यास कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. यश मिळवण्यासाठी मर्यादा सांभाळणे आवश्यक आहे. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. मुलांच्या समस्यांचे निराकरण करण्यात तुमचा मोठा सहभाग असेल. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
वृषभ : कोणताही निर्णय शहाणपणाने घ्या
वृषभ
ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. भूतकाळातील चुका लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीत केलेले बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जवळच्या नातेवाईकाशी सुरु असलेला वादही मिटू शकतो. तरुणांना करिअरशी संबंधित परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय शहाणपणाने घ्या. तुमची महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. निरर्थक गोष्टींवर वेळ वाया घालवू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात.
मिथुन : तरुणांच्या मेहनतीला यश मिळेल
मिथुन
श्रीगणेश म्हणतात की, आज कोणत्याही काम करण्यापूर्वी त्याचा पूर्ण आराखडा तयार करा. मालमत्ता खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तरुणांच्या मेहनतीला यश मिळेल. दिखाव्यासाठी चुकीच्या गोष्टींवर खर्च करू नका. बाहेरील लोक किंवा मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. जवळच्या नातेवाईकाशी वाद असल्यास थोडी सावधगिरी नाते टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ व्यतित कराल.
कर्क : कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका
कर्क
आज कुटुंबाताील सदस्यांचा वाद ज्येष्ठांच्या मदतीने सोडवला जाऊ शकतो. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. विद्यार्थ्यांना एखाद्या प्रकल्पात अपेक्षित यश न मिळाल्याने तणाव जाणवेल. कोणत्याही कामात धोका घेण्याचा प्रयत्न करू नका. सध्या मुलांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी त्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. व्यवसायातील व्यवहार सामान्य राहतील.
सिंह : कोणताही महत्त्वाचा व्यवसाय निर्णय घेऊ नका
सिंह
आज तुम्ही कामाच्या व्यापातूनही तुमच्या आवडींसाठी वेळ काढाल. तुम्ही उत्कृष्ट पालक असल्याचे सिद्ध कराल. अनुभवी आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचा आणि सल्ल्याचा फायदा होईल. शेजाऱ्यांसोबत कोणत्याही वादात अडकू नका; त्यामुळे गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित कोणताही कर्ज घेताना इतरांशी चर्चा करा. आज कोणताही महत्त्वाचा व्यवसाय निर्णय घेऊ नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. पती-पत्नीच्या नातेसंबंधात काही वाद उद्भवू शकतो.
कन्या : नशिबाऐवजी कर्मावर विश्वास ठेवा
कन्या
श्रीगणेश म्हणतात की, आज नशिबाऐवजी कर्मावर विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीमुळे एखादे ठराविक काम पूर्ण करण्यात यश मिळेल. सामाजिक सेवेसाठी काम करणाऱ्या संस्थेसोबत एका खास कामात योगदान द्याल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करतील. घराशी संबंधित कोणत्याही वादग्रस्त गोष्टी एकत्र बसून सोडवल्यास परिस्थिती लवकर अनुकूल होईल. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस योग्य नाही. कार्यक्षेत्रात कोणताही महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका.
तूळ : मनाप्रमाणे दिवस घालवल्यामुळे प्रसन्न वाटेल
तूळ
श्रीगणेश सांगतात की, न्यायालयाशी संबंधित एखादी प्रक्रिया चालू असेल, तर निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. तुमच्या मनाप्रमाणे दिवस घालवल्यामुळे प्रसन्न वाटेल. समाजात तुमचा सन्मान टिकून राहील. प्रवास टाळा. घराशी संबंधित कामांवर अधिक खर्च होऊ शकतो. हट्टीपणामुळे नात्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता.
वृश्चिक : वैयक्तिक गोष्टी कोणालाही सांगू नका
वृश्चिक
श्रीगणेश म्हणतात की, आज काही नवीन फायदेशीर संपर्क प्रस्थापित होतील. जवळच्या नातेवाईकाच्या घरी येण्यामुळे घडामोडींना गती मिळेल. ज्येष्ठांच्या भेटीमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि विचारसरणीत नवकल्पना येतील. तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणालाही सांगू नका. मुलांच्या कोणत्याही नकारात्मक वर्तनामुळे मन अस्वस्थ होईल. धार्मिक ठिकाणी वेळ घालवल्याने तुम्हाला अधिक शांतता मिळेल. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका.
धनु : व्यवसायात यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल
धनु
श्रीगणेश सांगतात की, मेहनतीच्या जोरावर कोणतेही कठीण काम पूर्ण कराल. नातेवाईक आणि मित्रांसोबत थोडा वेळ घालवा. दुपारनंतर कोणतीही अप्रिय बातमी मिळाल्यास मन निराश होईल. वर्गात मजेत वेळ घालवताना विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाशी तडजोड करू नयेत. कठीण प्रसंगी विश्वासू मित्राशी चर्चा करून समस्येचा सामना करा. व्यवसायात अपेक्षित यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
मकर : घराची योग्य व्यवस्था राखण्यातही तुम्हाला यश मिळेल
मकर
श्रीगणेश म्हणतात की, आज प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राजकीय मदत घ्या, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. घराची योग्य व्यवस्था राखण्यातही तुम्हाला यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही थोडे गोंधळलेले असाल तुमच्याच जवळचा एखादा नातेवाईक तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतो. व्यवसायात तुमचे काम करण्याचे पद्धत प्रभावी असेल.
कुंभ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील
कुंभ
श्रीगणेश सांगतात की, तुम्ही सामाजिक कामांमध्ये आणि सामाजिक सेवेसाठी काम करणाऱ्या संस्थेसोबत योगदान द्याल. बाहेरील कामांबरोबर घर आणि कुटुंबाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून दूर रहा, प्रवासही टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मीन : मच्या कामात व्यस्त राहाल
मीन
श्रीगणेश म्हणतात की, ग्रहस्थिती अनुकूल आहे. कोणतीही वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. वारसाहक्काशी संबंधित कामेही पूर्ण होऊ शकतात आणि परस्पर नातेसंबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. कोणत्याही चुकीच्या वादात अडकू नका. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहाल. दिवसाच्या दुसऱ्या भागात काही प्रतिकूल परिणाम येऊ शकतात. सुरू असलेल्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. खर्चाबद्दल जास्त विचार करू नका. भागीदारीशी संबंधित कामे सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.