खेड / प्रतिनिधी:- मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीनजीक हॉटेल पॅगोडाजवळ डंपरला कंटेनरने धडक देत अपघात केल्याप्रकरणी कंटेनर चालक राम सुभाष पाल (रा. उत्तरप्रदेश) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत डंपर चालकाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तो डंपरमधून स्पॅक कंपनीत कोळसा खाली करून पुन्हा वडखळ येथे जाण्यासाठी निघाला असता कंटेनर चालकाने सिग्नल न देता अचानक कंटेनर रस्त्याच्या दुभाजकातून आत घेतल्याने डंपरला धडक दिली. यामध्ये डंपरचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.