चिपळूण : शहरातील भोगाळे येथे एकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. यात एकजण जखमी झाला असून मारहाण करणाऱ्या तिघांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश मधुकर जामसुदकर (49), सौरभ उमेश जामसूदकर (20), नीलेश मधुकर जामसुदकर (44, तिघे-मुरादपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद निवास गुलाब लोंढे (50, शंकरवाडी) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवास लेंढे हे भोगाळे येथील दर्गाजवळ दर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी उमेश जामसूदकर हा मद्यप्राशन करून पडला होता. त्याने निवास लोंढे यांना ‘दर्गा माझा आहे, तुम्ही येथे यायचे नाही’ असे सांगितले. त्यानंतर निवास लोंढे यांच्या घरी जाऊन उमेशचा मुलगा सौरभ तसेच नीलेश जामसूदकर यांनी शिवीगाळ केली. यानंतर निवास लोंढे पुन्हा दर्ग्याजवळ बुधवारी गेले असता त्या ठिकाणी पाया पडून रात्री 10.30 च्या दरम्यान बाहेर पडत असताना उमेश व सौरभ यानी त्यांना मारहाण केली. यात ते जखमी झाले. या प्रकरणी त्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.