खेड:-वीजबिल शून्य आणि वीज विकून उत्पन्नाची संधी प्राप्त करून दिली जाणारी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राबवण्यास सुरवात झाल्यापासून खेड, मंडणगड तालुक्यात २५हून अधिक ग्राहकांनी लाभ घेतला आहे.
आतापर्यंत योजनेसाठी अत्यल्प प्रतिसाद लाभला असला तरी ही योजना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीनही तालुक्यात महावितरणकडून जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.
केंद्र सरकारकडून ३ किलो क्षमतेपर्यंतच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. सौरऊर्जा प्रकल्पातून ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यास वीजबिलही शून्य येणार असून, वीज विकून उत्पन्न मिळवण्याची संधीही मिळणार आहे. ग्राहकांची शिल्लक वीज महावितरणच विकत घेणार आहे. महावितरणतर्फे रूफटॉप सोलर बसवणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर दिले जात आहे. महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रियाही सुलभ व जलद केली असून, १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. ही योजना राबवण्यास सुरवात झाल्यापासून खेड, मंडणगड तालुक्यात २५हून अधिक ग्राहकांनी लाभ घेतला आहे. हा प्रतिसाद अत्यल्प असला तरी ही योजना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीनही तालुक्यांत महावितरणकडून जनजागृती करण्यावर भरही दिला जात आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.