रत्नागिरी:-शहरातील कोकणनगर येथे युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 च्या उघडकीस आली. भावना सतकुमार चौधरी (16, रा.कोकणनगर, रत्नागिरी) असे मृत युवतीचे नाव आहे. भावना ही 14 फेबुवारी रोजी दुपारी 1 च्या सुमारास घराच्या बाथरुममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली, अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आहे.