रायगड:- जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागांमध्ये कार्यरत असलेल्या लेखनिकाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतना व्यतिरिक्त त्यांच्या नावावर विविध कर्ज दाखवुन आपल्या वैयक्तीक खात्या मध्ये जमा कले आणि सुमारे १कोटी १९ लाख रुपयांचा अपहार केला असल्याचे उघडकीस आले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यांत आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागामध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार करणाऱ्या संशयीत कर्मचाऱ्याचे नाव नाना कोरडे असुन हा कर्मचारी गेल्या अनेक वर्षा पासुन रायगड जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे.आर्थिक वर्षातील इन्कम टॅक्सचे कामकाज पाहात असताना जिल्हा परिषदेतील एका महिला कर्मचारीला कर्मचाऱ्यांच्या बिला मध्ये अपरातफर करण्यात आली असल्याची आढळून आल्या नंतर महिला कर्मचाऱ्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी डॉ बास्टेवाड यांच्या निदर्शनाला ही गंभीर बाब आणुन दिली. या गंभीर प्रकरणाची त्वरीत चौकशी करण्यांत यावी असे आदेश देण्यांत आल्या नंतर नाना कोरडे याने कोट्या वधी रुपयांचा अपहार केला असल्याचे आढळून आले. सदरच्या अपहाराची सखोल चौकशी करण्यासाठी पाच जणांची एक समिती नेमण्यांत आली असुन या समिती कडून पडताळणी करण्यांत आल्या नंतर अपहार किती रुपयाचा करण्यांत आला आहे याची माहिती समोर येईल असे डॉ.बास्टेवाड यांनी सांगितले. त्याच बरोबर कोरडे याच्या विरोधांमध्ये निलंबनाची कार्यवारी करण्यांत येणार असल्याची माहिती देण्यांत आली असुन त्या नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यांत येणार आहे.