अंकुर कीर यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
श्रीमान भागोजीशेठ किर यांनी उभ्या केलेल्या सर्व वास्तू आज १०० वर्षांनंतरही दर्जेदारपणे व दिमाखदार पध्दतीने उभ्या
रत्नागिरी:-श्रीमान भागोजीशेठ किर यांनी उभ्या केलेल्या सर्व वास्तू आज १०० वर्षांनंतरही दर्जेदारपणे व दिमाखदार पध्दतीने उभ्या आहेत. त्यामुळे माझ्या मालकीच्या सदर पतितपावन मंदीरामध्ये कोणत्याही जिर्णोध्दाराची आवश्यकता नाही. सदरबाबत आपला हेतू जरी चांगला असला तरी काही लोकांकडून आपल्याला चुकीची माहिती देऊन आपली दिशाभूल करुन शासनाचा निधी न्यायप्रविष्ठ असलेल्या ठिकाणी केला जाण्याची शक्यता आहे. तरी आपण या विषयी कोणतीही प्रकीया राबवू नये अन्यथा मा. उच्च न्यायालयाचे आदेशाचा भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्या करीता आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन अंकुर अनंत कीर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
दानशूर श्रीमान भागोजीशेठ किर यांनी स्वः खर्चाने रत्नागिरी येथे बांधलेल्या पतितपावन मंदीराचा जिर्णोध्दार करणेकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असलेची बातमी रत्नागिरी येथील वृत्तपत्रांमधून तसेच सोशल मिडीयावर प्रसारीत करणेत येत आहे.
सदरबाबत आम्ही आपले निदर्शनास वस्तूस्थिती आणून देऊ इच्छीतो की, दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजीशेठ किर यांनी वीर सावरकर यांचे विनंतीवरुन सन १९२९ साली शेवडे यांचेकडून गाडीतळ, रत्नागिरी येथील २१ गुंठे जागा खरेदी करुन त्यावर सर्व जातींमधील स्पृश्य-अस्पृश्यांचे दर्शनाकरीता रु. ७१,५७२/- स्वःताचे खाजगीतून खर्च करुन देशातील पहिले पतितपावन मंदीर व शेजारील धर्मशाळा सन १९३१ साली बांधल्या. आणी भागोजीशेठ किर हयात असेपर्यंत पतितपावन मंदीराची दिवाबत्तीपासून सहभोजनाची सर्व खर्च भागोजीशेठ किर त्यांचे खाजगी उत्पन्नातून स्वतः करीत असत. याबाबतची नोंद भागोजीशेठ किर चॅरिटेबल ट्रस्ट चे ऑडीट रिपोर्ट मध्ये नमूद आहे.
दिनांक २४/०२/१९४४ रोजी श्रीमान भागोजीशेठ किर यांचे निधनानंतर त्यांच्या खाजगी जमिनी, मिळकती आणी मंदिर स्थळे सन १९४७ सालापासून माननीय मुंबई हाय कोर्टाचे कोर्ट रिसीव्हर यांचे ताब्यात होत्या. त्याचा निकाल सन २००४ साली लागला व या सर्व खाजगी जमिनी, मिळकती आणी मंदिर स्थळे त्यांचे वंशजांचे ताब्यात देण्यात आल्या. यातील काही मंदिरे व जमिनी मुंबई माननीय हाय कोर्टाचे कोर्ट रिसीव्हर यांचे ताब्यात असताना काही लोकांनी बेकायदेशीररित्या विकल्या व काही ठिकाणी बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन केले. परंतू पतितपावन मंदीर व परिसरातील बांधकामे आणी त्याखालील जागा ही मा. मुंबई हाय कोर्टाचे कोर्ट रिसीव्हर यांचे आदेशाने श्रीमान भागोजीशेठ किर यांचे वंशजांना देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीमान भागोजीशेठ किर यांचा नातू म्हणून त्याची मालकी सदर आदेशाप्रमाणे माझ्याकडे आहे.
श्रीमान भागोजीशेठ किर यांनी उभ्या केलेल्या सर्व वास्तू आज १०० वर्षांनंतरही दर्जेदारपणे व दिमाखदार पध्दतीने उभ्या आहेत. त्यामुळे माझ्या मालकीच्या सदर पतितपावन मंदीरामध्ये कोणत्याही जिर्णोध्दाराची आवश्यकता नाही. सदरबाबत आपला हेतू जरी चांगला असला तरी काही लोकांकडून आपल्याला चुकीची माहिती देऊन आपली दिशाभूल करुन शासनाचा निधी न्यायप्रविष्ठ असलेल्या ठिकाणी केला जाण्याची शक्यता आहे. तरी आपण या विषयी कोणतीही प्रकीया राबवू नये अन्यथा मा. उच्च न्यायालयाचे आदेशाचा भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्या करीता आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन अंकुर अनंत कीर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. सदर निवेदनाची प्रत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाणे येथे देखील सादर केली आहे.