मुंबई : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत कल्पक ग्रुप, पुणे या संस्थेच्या संगीत आनंदमठ या नाटकास प्रथम पारितोषिक, परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे, मुंबई या संस्थेच्या संगीत बावनखणी या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव कल्चरल ॲण्ड स्पोटर्स क्लब, गोवा या संस्थेच्या संगीत पाचवा मंत्र या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. संगीत नाट्य स्पर्धेचे अंतिम फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक रविंद्र सातपुते (नाटक-संगीत आनंदमठ), द्वितीय पारितोषिक घनःश्याम जोशी (नाटक-संगीत बावनखणी), नाटयलेखन प्रथम पारितोषिक विनीता तेलंग (नाटक-संगीत आनंदमठ), द्वितीय पारितोषिक संदीप मणेरीकर (नाटक-संगीत पाचवा मंत्र), संगीत दिग्दर्शन प्रथम पारितोषिक अजय पराड (नाटक-संगीत आनंदमठ), द्वितीय पारितोषिक दामोदर शेवडे (नाटक-संगीत पाचवा मंत्र), नेपथ्य: प्रथम पारितोषिक जयंत टोले (नाटक-संगीत आनंदमठ), द्वितीय पारितोषिक मनस्वी हरमलकर (नाटक- संगीत दैवगती), संगीतसाथ ऑर्गन वादक प्रथम पारितोषिक प्रसाद शेवडे (नाटक-संगीत मत्स्यागंध), द्वितीय पारितोषिक विशारद गुरव (नाटक- संगीत बावनखणी), संगीतसाथ तबला वादक प्रथम पारितोषिक दत्तराज च्यारी (नाटक- संगीत पाचवा मंत्र), द्वितीय पारितोषिक प्रथमेश शहाणे (नाटक- संगीत बावनखणी), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व्रजांग आफळे (नाटक- संगीत आनंदमठ), विपुल निमकर (नाटक- संगीत बावनखणी), स्नेहल गुरव-कारखानीस (नाटक- संगीत पाचवा मंत्र), सावनी शेवडे (नाटक- मत्स्यगंधा), उत्कृष्ट गायन रौप्यपदक अभिषेक काळे (नाटक- संगीत अतृप्ता), दशरथ नाईक (नाटक-संगीत दैवगती), अनुष्का आपटे (नाटक- संगीत आनंदमठ), कीर्ती कस्तुरे (नाटक- संगीत संन्यस्त खड्ग), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे स्मिता पाटील (नाटक- संगीत चोखा विठुचा), मधुरा लाकडे (नाटक- संगीत होनाजी बाळा), ऐश्वर्या भोळे (नाटक- संगीत सन्यस्त खड्ग), वरदा जोशी (नाटक- संगीत बावनखणी), करुणा गावकर (नाटक- संगीत धन्य ते गायनी कळा), प्रितेश मांजलकर (नाटक-संगीत शतजन्म शोधिताना), कुमार भोईर (नाटक- संगीत चोखा विठूचा), मनोहर जोशी (नाटक-संगीत मत्स्यगंधा), सुनिल बेंडखळे (नाटक- संगीत होनाजी बाळा), विवेक नाईक (नाटक-संगीत अलख निरंजन) गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शारदा शेटकर (नाटक- संगीत कधीतरी कोठेतरी), श्रद्धा जोशी (नाटक- संगीत दैवगती), अनुजा जोशी (नाटक- संगीत आनंदमठ), देवश्री शहाणे (नाटक-संगीत बावनखणी), ऋतुजा पटवर्धन (नाटक- संगीत अतृप्ता), दत्तगुरु केळकर (नाटक-संगीत कधीतरी कोठेतरी), साबा च्यारी (नाटक-संगीत पाचवा मंत्र), लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (नाटक- संगीत मत्स्यगंधा), गुरुराज ठाकूर देसाई (नाटक- संगीत होनाजी बाळा), प्रविण शिलकर (नाटक- धन्य ते गायनी कळा)
दि. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत श्रीमंत घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. दिपक कलढोणे, श्री. राजेंद्र फडते, सौ. मंगला आपटे, श्री. संजय जोशी आणि श्री. वसंत दातार यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या संगीत नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
खल्वायन संस्थेचे तीन जणांना पारितोषिक प्राप्त झाले आहे.