रत्नागिरी ः राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसुचित जाती प्रवर्ग मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप अंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सन 2023-2024 साठी 2672 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 1635 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली असून ती त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.
अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावे, यातून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक मजबूत व्हावी, या उद्देशाने समाजकल्याण विभागामार्फत गेले अनेक वर्षे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप दिली जाते. यापूव ऑफलाईन असलेली पद्धत शासनाने ऑनलाईन करत लाभाथ विद्यार्थ्याच्या बँक खात्याव शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते.
महाविद्यालयामार्फतच विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. जिल्ह्यातील 2672 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. अपुऱ्या कागदपत्रामुळे 222 अर्ज तात्काळ रद्द करण्यात आले. उर्वरित 2450 अर्जांपैकी दहा अर्ज छाननीत बाद झाले. एकूण 1649 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली असून त्यापैकी 632 प्रकरणे प्रलंबित आहे तर 1635 विद्यार्थ्यांना अंतिम शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.
यापूर्वी जिल्हास्तरावरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रक्कमेचे वाटप केले जात होते. परंतु राज्यभरातून विद्यार्थ्यांसह पालकांच्या तक्रारी आल्याने समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया ऑनलाईन करून थेट राज्यस्तरावरूनच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती रक्कम जमा केली जाते.