उदय दणदणे / दापोली (नवशी) :
कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई (रजि.)कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आयोजित रत्नागिरी रायगड जिल्हा स्तरीय गौरी गणेश नृत्य स्पर्धा २०२४-२५ मु.नवशी दापोली येथे शनिवार दि.८फेब्रुवारी २०२५ रोजी मोठया दिमाखात संपन्न झाल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनंत तांबे यांनी भूषविले,सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून व शिव शक्ती च्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे अध्यक्ष अनंत तांबे व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आली. मान्यवर स्वागत गीत नवशी येथील लहान मुलींनी सुंदर गीत गाऊन केले.नृत्य स्पर्धेचे उदघाटन मंडणगड चे सुपूत्र कैलास शंकर धाडवे व ऍड. दिपांजली कैलास धाडवे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
सदर स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. सहभागी स्पर्धकां मधून तीन संघ विजयी घोषित करण्यात आले.त्यात प्रथम विजेता पारितोषिक संघ भोलेनाथ नृत्य कला पथक शाहीर- महेश भुवड साखरोली ता.खेड ,द्वितीय क्रमांक राधाकृष्ण नृत्य कला पथक किन्हळ शाहीर पप्या जोशी व तृतीय विजेता संघ ओम साई नृत्य कला पथक शाहीर अजित गोवले -होडखाड खेड यांनी पटकावला.तसेच उत्कृष्ट गायक खेमेश्वर नृत्य कला पथक शाहीर रमाकांत हुमणे व उत्कृष्ट ढोलकी वादक हेमंत दुबळे वनंद यांनी पटकावला.तिन्ही विजयी संघांना सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र, ढोलकी व रोख रक्कम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.सहभागी संघांना सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र ,ढोलकी देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गायक यांना करा ओके साउंड व प्रशस्तीपत्र व उत्कृष्ठ ढोलकी वादक यांना ढोलकी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा परीक्षक म्हणून कविता विभाग सुर्यकांतजी चव्हाण,निलेश जोगले व दिलीप नामे, रंगबाजी-१ सुरेश चिबडे, झराजी वीर व दामोदर गोरीवले
रंगबाजी -२ सुरेश ऐनारकर, प्रकाश पांजणे व तुषार पंदेरे तसेच चाल ताळमेळ विभाग – चंद्रकांत गोताड,अनंत एलमकर व चंद्रकांत धोपट व सरपंच पदी अनंत तांबे व संतोष धारशे यांनी काम पाहिले. सदर सोहळ्यात जेष्ठ व नवोदित शाहिरांचा सन्मान सन्मानचिन्ह, शाल,प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस संतोष धारशे व चिटणीस सुधाकर मास्कर यांनी केले तसेच मान्यवरांचे सन्मान व स्वागताचे सूत्र संचालन शाहीर मारुती चव्हाण व शाहीर अनंत मांडवकर यांनी केले.
ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अनंत तांबे ,उपाध्यक्ष सुरेश चिबडे,सुरेश ऐनारकर,सरचिटणीस संतोष धारशे ,खजिनदार सत्यवान यादव,चिटणीस सुधाकर मास्कर,कार्यकारिणी सदस्य: अनंत मुंगळे ,सुरेश कदम,दिपक म्हादये,निलेश जोगले तसेच वादविवाद समिती:अध्यक्ष शंकर भारदे गुरुजी उपाध्यक्ष,चंद्रकांत धोपट,दिलीप नामे व दामोदर गोरीवले,अरविंद स्टुडिओ मालक अनंत बाईत तसेच दापोलीतील शाहीर मारुती चव्हाण,अनंत मांडवकर,प्रभाकर चोरगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाने सदर स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.