चिपळूण (प्रतिनिधी) : महिला विकास कक्ष, डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण यांच्या वतीने ६ फेब्रुवारी २०२५ रोजी “मानसिक आरोग्य जनजागृती कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी सौ. कश्मिरा शिंदे समुपदेशक व सौम्य कौशल्य प्रशिक्षक (Counsellor & Soft Skills Trainer) यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत मानसिक आरोग्याचे महत्त्व, दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या जसे की तणाव, चिंता, नैराश्य यांचा सामना कसा करावा यावर सखोल चर्चा झाली. विद्यार्थिनींना या समस्यांवर मात करण्यासाठी उपयुक्त तंत्रे व सकारात्मक जीवनशैलीचे मार्गदर्शन देण्यात आले. या कार्यशाळेला विविध वर्ग आणि शाखांतील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य बापट यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रिया काटदरे यांनी सहकार्य केले.