संगमेश्वर:- तालुक्यातील मेघी गावची सुकन्या कु. सोनाली चंद्रकांत बेटकर हिने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा वकील म्हणून डिग्री मिळविली आहे. सोनाली बेटकर ही मेघी गावच्या इतिहासातील पहिली एल. एल. बी. (वकील )पदवी मिळवणारी महिला ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले जात असुन शुभेच्छाही दिल्या जात आहेत.
अतिशय खडतर खडतर परिस्थितीत भिमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री आणि भिमाच्या या लेकिने परिस्थितीवर मात करून ही पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या यशाबाबत सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. तिच्या या यशात खऱ्याअर्थाने तिचे वडील चंद्रकांत बंडु बेटकर जे महानगरपालिकेच्या सेवेतून नुकतेच निवृत्त झाले आहेत आणि आई अर्चना चंद्रकांत बेटकर यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची त्यांची ईच्छा त्यांनी खरोखरच अमलात आणली आहे. सोनाली बरोबर त्यांच्या कुटुंबीयांचे देखील अभिनंदन केले जात आहे. विशेष करून ॲडव्होकेट सोनाली चंद्रकांत बेटकर ही लवकरच म्हणजे १६ फेब्रुवारी २०२५ रोजी उच्चशिक्षित चि. अनिकेत मिलिंद मोहिते यांच्यासोबत लग्न बंधनात साथसोबत करणार आहेत आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल आणि भावी वैवाहिक जीवनासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.