मेष : आज ग्रहांचे भ्रमण तुमच्यासाठी लाभाचे दरवाजे उघडतय
श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहांचे भ्रमण तुमच्यासाठी लाभाचे दरवाजे उघडत आहे. फक्त योग्य परिश्रमाची आवश्यकता आहे. शुभचिंतकाची मदत तुम्हाला आशेचा एक नवीन किरण देईल. विद्यार्थी आणि तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक गंभीर असतील. घाईघाईने आणि भावनिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेऊ नका. वाहन किंवा कोणत्याही महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान झाल्यास जास्त खर्च येऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा.
वृषभ : आजचा दिवस संमिश्र परिणाम देणार आहे
श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस संमिश्र परिणाम देणार आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल. समान विचारसरणीच्या लोकांना भेटल्याने नवीन ऊर्जा मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत काही तणाव अनुभवाल. संयमाने समस्येवर मात कराल. व्यापारात लाभ संभवतो. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
मिथुन : सकारात्मकत विचार केला तर तुमचा आत्मविश्वास दुणावेल
श्रीगणेश म्हणतात की, सकारात्मकत विचार केला तर तुमचा आत्मविश्वास दुणावेल. कुटुंबातील व्यवस्था योग्य व्यवस्था राखण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल. इतरांच्या खासगी बाबींमध्ये हस्तक्षेप टाळा. प्रवास त्रासदायक ठरतील. व्यवसायात अधिक व्यस्त राहू शकता. कुटुंब आणि व्यावसायिक कामांमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. रक्तदाब आणि मधुमेहेचा त्रास असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी.
कर्क : दिवसाची सुरुवात एका आनंददायी घटनेने होऊ शकते
आजच्या दिवसाची सुरुवात एका आनंददायी घटनेने होऊ शकते. आर्थिक प्रश्न सुटतील. मित्र किंवा सहकाऱ्यांबरोबरील चर्चा योग्य परिणाम मिळू शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात काळजी घेण्याची गरज आहे, असा सल्ला श्रीगणेश देताता. उत्पन्नाचा स्रोत वाढेल; परंतु त्याचवेळी जास्त खर्चामुळे आर्थिक ताण येईल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जाणवेल. आरोग्य चांगले राहील.
सिंह : राहणीमान सुधारण्यासाठी तुमचा दृष्टिकोन थोडा व्यापक
श्रीगणेश सांगतात की, घरातील अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद लाभेल. राहणीमान सुधारण्यासाठी तुमचा दृष्टिकोन थोडा व्यापक असेल. आवडत्या कामांमध्ये वेळ व्यतित करणे आरामदायी ठरू शकते. दुपारनंतर अनावश्यक खर्च वाढल्याने आर्थिक नियोजन कोलमडेल. सध्या फक्त नियोजित कामांवर लक्ष केंद्रित करणे लाभदायक ठरेल. पती-पत्नीमध्ये काही वाद होऊ शकतात.
कन्या : विवाहित व्यक्तींना सासरच्या लोकांशी मतभेद टाळा
श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही कार्यक्षेत्रात नवीन कल्पना राबवाल. विवाहित व्यक्तींना सासरच्या लोकांशी मतभेद टाळा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहिल. ताणतणावाचा आरोग्यावर परिणाम होईल.
तूळ : रागामुळे मोठे नुकसान होवू शकते
आज तुम्ही महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. रागामुळे मोठे नुकसान होवू शकते, याची जाणीव ठेवा. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा सकारात्मक ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाची मदत घ्या.
वृश्चिक : मित्रांसोबत वेळ घालवू नका
श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही कर्मावर विश्वास ठेवून वाटचाल कराल. तुमचे संपूर्ण लक्ष आर्थिक बाबींवर असेल. कठोर परिश्रमाचा काळ आहे. मित्रांसोबत वेळ घालवू नका. कार्यक्षेत्रात पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक प्रश्नात बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करु देवू नका. आरोग्याची काळजी घ्या.
धनु : एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्य लाभदायक ठरेल
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही एक विशेष काम पूर्ण करू शकता. इतरांना मदत कराल. कोणत्याही नातेवाईकाच्या नकारात्मक बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. पैशाच्या व्यवहारात थोडी काळजी घ्या. एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्य लाभदायक ठरेल. कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेवू नका, याचा आरोग्यावर परिणाम होईल.
मकर : आहारावर नियंत्रण ठेवा
श्रीगणेश म्हणतात की, आज घरातील कामांना प्राधान्य द्याल. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कामाच्या ठिकाणी अचानक परिस्थिती सुधारल्याने दिलासा मिळेल. आहारावर नियंत्रण ठेवा.
कुंभ : सामाजिक किंवा राजकीय कार्यात जास्त वेळ घालवाल
श्रीगणेश सांगतात की, आज सामाजिक किंवा राजकीय कार्यात जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवावा. आर्थिक गुंतवणूक करताना माहिती घेवूनच निर्णय घ्या. जोडीदारासह कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मीन : दिनचर्येत एक छोटासा बदल कराल जो सकारात्मक असेल
मागील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ताण आज दूर होऊ शकतो. तुम्ही तुमच्या दिनचर्येत एक छोटासा बदल कराल जो सकारात्मक असेल. घरातील खरेदीच्या बाबतीतही तुमचा कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाईल. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करा. व्यवसायात काम सुरळीत सुरु राहील. पती-पत्नी त्यांच्या व्यस्ततेमुळे एकमेकांना वेळ देऊ शकणार नाहीत.