दापोली:-अडखळ ग्रामपंचायत सरपंच अपात्रताप्रकरणी दाखल झालेल्या अपिलावर आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या (सीईओ) दालनातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.
ही सुनावणी ग्रामविकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी घेतली.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल पडताळून कोकण आयुक्तांकडे पाठवला होता. कोकण आयुक्तांनी २१ जानेवारीला सरपंच रवींद्र घाग यांना दोषी ठरवत अपात्र ठरवल्याचा निर्णय दिला. हा निर्णय २७ जानेवारीला पंचायत समितीकडून उपसरपंचांना मिळाला. तोपर्यंत अपात्र ठरवलेल्या सरपंचांनी प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फडकावला. या निर्णयाविरोधात कोकण आयुक्तांनी अपात्र ठरवल्याच्या निर्णयाला घाग यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे अपील केले होते. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. अपात्रतेची मागणी करणारे उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकारी या वेळी उपस्थित होते.