संगमेश्वर:-तालुक्यातील कसबा येथील हेमाडपंथी, पांडवकालीन, प्राचीन अशा श्री देव कर्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उत्सव २२ ते २८ फेब्रुवारी असा साजरा करण्यात येणार आहे.मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये २२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान दररोज सकाळी ८ वा. श्रींची पूजा व अभिषेक, रात्री ७.३० वाजता आरती मंत्रपुष्प होईल. २५ रोजी मन्युसुक्त याग होणार आहे तर रात्री कीर्तन असेल. २६ रोजी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरणार आहे. सायंकाळी ६ वाजता कीर्तन तर रात्री १० वा. श्रींचा पालखी सोहळा, २७ ला रात्री कीर्तन तर २८ रोजी रात्री ९.३० वाजता फक्त हरिनाम भजन मंडळ यांचे भजन होईल. रात्री १२ नंतर लळीत होऊन उत्सवाची सांगता होईल. यावर्षी कीर्तनसेवेला पनवेलचे ख्यातनाम कीर्तनकार नंदकुमार कर्वे बुवा असतील तर साथीला संवादिनी चैतन्य पटवर्धन, तबला केदार लिंगायत असणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक न्यासाच्यावतीने करण्यात आले आहे.